सातारा जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी युवा नेते दाऊद मुल्ला यांची नियुक्ती झाल्यानिमित्त म्हसवड मुस्लिम समाजातर्फे जामा मशीद म्हसवड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी दाऊद मुल्ला यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात माण तालुका ओबीसी विभागाचे तालुका अध्यक्ष गब्बार काझी, हाजी शौकत भाई मुल्ला, मौलाना सद्दाम पापा काझी, बशीर काझी, शकील मुल्ला, दस्तगीर मुल्ला, मोहसीन तांबोळी, शब्बीर तांबोळी, पत्रकार अहमद मुल्ला, असिफ मुजावर, जमीर मुजावर, ताजुद्दीन तांबोळी, जहांगीर तांबोळी, शाकीर मुल्ला यांसह अन्य मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाचे आयोजन शब्बीर तांबोळी व मोहसीन तांबोळी यांनी केले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दाऊद मुल्ला यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याला पाठिंबा व्यक्त केला