इंजि. सुनील पोरे व कुटुंबीय यांचेकडून मुस्लिम बांधवांना खजूर वाटप
व्हिजन २४ तास न्युज (संपादक: अहमद मुल्ला )
म्हसवड
मुस्लिम धर्मियाच्या पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून इंजि.सुनील पोरे यांनी रोजा सोडण्याठी लागणाऱ्या खजूराचे सर्व मुस्लिम बांधवाना वाटप केले
मुस्लिम धर्मियाच्या पवित्र रमजान महिना सुरु असुन या महिन्यात लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्व मुस्लिम बांधव रोजा (कडक उपवास ) धरत असतात या रोजाच्या महिन्यात खजूराचा उपयोग अत्यंत महत्वाचा मानला गेला आहे .सर्व मुस्लिम बांधव रोजा हा खजूर खाऊनच सोडतात ज्यांच्या कडे खजूर नसेतर मीठ किंवा कोणतेही फळ मिळाले तर त्यावर रोजा सोडतात हेच औचित्य साधून इंजि. सुनील पोरे व कुटुंबीय यांनी रोजा सोडणेच्या वेळापूर्वी म्हसवड मधील सर्व मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन खजूर वाटप केले व रोजे ठेवणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाबद्दल पोरे कुटुंबीयांचे मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त करुन त्यांना धन्यवाद दिले असे नवनवीन लोकोपयोगी उपक्रम कायम इंजि.सुनील पोरे राबवत असतात या उपक्रमा बद्दल म्हसवड येथे इफ्तार पार्टी दरम्यान जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी मुस्लिम बांधवांना खजूर भरवताना इंजि. सुनील पोरे यांचे खजूर वाटप उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.