सर्वोच्च न्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन
व्हिजन २४ तास न्यूज संपादक : अहमद मुल्ला
सांगली प्रतिनिधी
बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित महासंघ तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे सर यांच्या आदेशानुसार घेण्यात आले.
या आंदोलनात दलित महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम चांदणे (आप्पा), राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे दादा, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोहिते दादा यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडले.
सांगली जिल्हा प्रभारी व दलित महासंघ जिल्हाध्यक्ष तसेच बहुजन समता पार्टी चे जिल्हाध्यक्ष मा. बळीराम रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध निदर्शने शांततेत पार पडली.

यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी आवाज उठवला. त्यात मा. प्रकाश वायदंडे, मा. दिनकर वायदंडे, मा. मोहन माने, मा. धोंडीराम कांबळे, मा. दिपक मिसाळ, मा. अनिल थोरात, मा. नाना कांबळे, मा. अरुण सातपुते, मा. आकाश कांबळे, सौ. शितल सकट, सौ. मोहिते मॅडम, सौ. सोनाली कांबळे यांचा विशेष सहभाग होता.
आंदोलनादरम्यान दलित महासंघाने सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, संविधान आणि न्यायव्यवस्थेचे रक्षण हे सर्व नागरिकांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

