दहिवडीतील अपघातात युवकाचा जागीच मृत्यू
बिदाल प्रतिनिधी / ता. १ :
दहिवडी ( ता. माण ) येथे दहिवडी मायणी रोडवरती मोरे वस्ती नजीक पिंगळी ता. माण येथील युवक विकास विठ्ठल कांबळे( वय ४५)हा उभा असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतील वीजवितरण च्या पोलला पाठीमागून येऊन धडकल्याने जागीच मृत्यू झाला.
विकास कांबळे हा युवक दहिवडीतील काम आटपून घराकडे निघाला होता. मोरे मळा नजीक वीज वितरण कंपनीचे खाजगी कॉन्ट्रॅक्टर बापूराव संपत सस्ते यांचा लाईटच्या पोलने भरलेला बिना नंबर प्लेटचा ट्रॅक्टर रस्त्याच्या साईट पट्टीच्या बाहेर उभा न करता तीस फूट डांबरीवर उभा केला होता.आणि पाठीमागून ट्रॅक्टर मधील पोल न दिसल्याने युवक विकास कांबळे हा जाऊन त्या पोलवरती जोरदार धडकल्याने डोक्याला मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तप्रवाह झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मृत्यू विकास कांबळे यांच्या पश्चात पत्नी आई व दोन बहिणी असा परिवार असल्याने घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस करत आहेत.