व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी :
सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलिसांनी अत्यंत धाडसाने काम करत नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला शिताफीने अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. वाळूज एमआयडीसी, जिल्हा संभाजीनगर येथे हा आरोपी दडून बसल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
घटना तपशील:
दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 5/2024 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या 363 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पांगरी येथील अल्पवयीन मुलगी अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या तपासादरम्यान, वैभव किसन गायकवाड (राहणार पांगरी) याने पीडित मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाली. आरोपी तब्बल नऊ महिने फरार होता.
काल, वाळूज येथे आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, दहिवडी पोलिसांनी तातडीने पथक पाठवून आरोपी व अपहरित मुलीला ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
धडाकेबाज कामगिरी करणारे पोलीस अधिकारी:
सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक, सातारा, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, पोलीस हवालदार रवींद्र खाडे, महिला पोलीस नाईक नीलम रासकर, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट व महेंद्र खाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दहिवडी पोलिसांच्या या तडाखेबाज कामगिरीमुळे आरोपीजेरबंद झाला असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल अशी अपेक्षा आहे