सातारा जिल्ह्यात मोबाईल हस्तगत मोहिमेत दहिवडी पोलीस ठाणे अव्वल ७७ मोबाईल हस्तगत; तब्बल १५ लाख ४० हजारांचा मुदतेमाल परत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
मा. दुरसंचार महासंचालक सो. भारत सरकार दुरसंचार विभागातर्फे सुरु करण्यात आलेल्या CEIR पोर्टलचा वापर करून हरवलेले मोबाईल शोधून काढण्यात सातारा जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेत विशेष कामगिरी बजावणाऱ्या दहिवडी पोलीस ठाण्याने सातारा जिल्ह्यातील अव्वल स्थान मिळवले आहे.

जानेवारी २०२५ पासून ते आजअखेर राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हैद्राबाद, जामखेड, उस्मानाबाद, सांगली, पंढरपूर, मुंबई, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर अशा विविध ठिकाणी शोध लागलेल्या एकूण ७७ मोबाईल हँडसेट्स (किंमत १५ लाख ४० हजार रुपये) हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत करण्यात आले आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी मा. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, मा. रणजीत सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग (कॅम्प वडुज) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यामध्ये दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांचे विशेष योगदान राहिले.

मोबाईल हस्तगत व परतविण्याच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे यांचा मा. पोलीस अधीक्षक सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *