दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी पोलीसांचा सराईत गुन्हेगारांना दणका* *१० जणांना केले हददपार ( तडीपार)*

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )

सादिक शेख ( पोलीस टाइम्स रिपोर्टर)

गोंदवले खुर्द

सध्या सर्वत्र गणेशोत्सव व ईद ए मिलाद सण साजरा होत असलेने नमुद सणांच्या कालावधीत दहिवडी पोलीस स्टेशन हददीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु न देता गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पडावेत या दृष्टीने दहिवडी पोलीस स्टेशन हददीत वेळोवेळी गुन्हे करुन सामाजिक स्वास्थ बिघडवणारे, दंगा, गोंधळ करणारे सराईत गुन्हेगार १ ) काशिनाथ सोनबा जाधव रा. आंधळी ता.माण २) रणजित सत्यवान जाधव रा. पांगरी ता.माण ३) शिवाजी कोंडीबा बोडरे रा. सोकासन ४) दिपक नामदेव मसुगडे ५) गौतम बापु खरात रा. मलवडी ता.माण ६) नितिन गौतम रणपिसे रा. गांधीनगर दहिवडी ७) नंदकुमार अंतु अवघडे रा. गोंदवले बु. ता. माण ८) महादेव विठठल जाधव रा. महीमानगड ता. माण ९) नवनाथ विलास चव्हाण रा. कोळेवाडी ता.माण १०) लखन शिवाजी जगदाळे रा. मोगराळे ता.माण यांना गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या कालावधीत माण तालुक्यातुन हददपार ( तडीपार ) करणेबाबत मा. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर मॅडम (उपविभागीय अधिकारी माण खटाव) यांना प्रस्ताव पाठविले होते.

त्यावरुन मा. प्रांताधिकारी उज्वला गाडेकर मॅडम (उपविभागीय अधिकारी माण खटाव) यांनी नमुद इसमांना वर नमुद

कालावधीत माण तालुक्यात प्रवेश करण्यास तसेच निवास करण्यास मनाई आदेश निर्गमीत केले आहे. नमुद इसमांना माण तालुक्यातुन हददपार (तडीपार) करण्यात आले आहे. अक्षय सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक दहिवडी पोलीस स्टेशन यांनी वर नमुद गुन्हेगार हे हददीत दिसुन आलेस तात्काळ दहिवडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याबाबत आवाहन केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!