दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनिअक्षय सोनवणे यांचा अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच
.व्हिजन २४ तास न्युज म्हसवड(संपादक अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी
दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मोरे मळा, काशिद वस्ती या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा.रोख रक्कम, जुगार साहित्य आणि वाहनासह 76,670 रुपयांचा मुद्देमाल जप्त
दहिवडी ,तालुका माण ,जिल्हा सातारा गावचे हद्दीत मोरे मळा, काशीद वस्ती येथे असलेल्या शेतातील शेडमध्ये तीन पाणी पत्त्यावर पैसे पैंजेवर लावून काही इसम जुगार खेळत असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टाफ सह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी 1) अनिल गजानन काशीद 2)सिद्धार्थ जालिंदर खरात 3)नितीन गौतम रणपिसे 4)रोहित हनुमंत अवघडे 5)विक्रम बाळासो जाधव 6)नागेश प्रकाश काळे हे जुगार खेळताना मिळून आले. त्यामुळे तात्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता सदरचा जुगार ते दिनेश गजानन काशीद यांच्या सांगण्यावरून खेळत असले बाबत सांगितल्याने दहिवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 4, 5, 12 (अ)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून रोख रक्कम, जुगार साहित्य आणि वाहनासह एकूण 76,670 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.. सदरची कारवाई खालील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे* 1) अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक 2) पोलीस हवालदार संभाजी खाडे 3) पोलीस नाईक स्वप्नील म्हामणे 4)पोलीस नाईक प्रमोद कदम 5)पोलीस नाईक महेंद्र खाडे