दहिवडी पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प पुरस्कार
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (नाशिक पोलीस टाइम्स )
सातारा: जिल्हा प्रतिनिधी
दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत केलेल्या कार्यवाहीत आदरणीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांचेकडून सन्मानित करण्यात आले.
मे 2023 मध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यात महिला पथदर्शी प्रकल्पाचे अनुषंगाने महिलांच्या सुरक्षिततेबाबत विविध उपक्रम राबवल्याबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक.समीर शेख , अप्पर पोलीस अधीक्षक . बांगर सर यांच्या हस्ते दहिवडी पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प मे 2023 चा पुरस्कार मिळाला आहे.सन्मान स्वीकारताना दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अक्षय सोनवणे, महिला पोलीस निलम रासकर, पोलीस श्री.योगेश बागल.दहिवडीकर नागरिकांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या