दहिवडी पोलिसांनी एका तासात उघडकीस आणला जबरी चोरीचा गुन्हा ,दोन आरोपीकडून १ लाख ३४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक ;अहमद मुल्ला )
सादिक शेख( पोलीस टाइम रिपोर्टर )
गोंदवले खु:
येळेवाडी ता माण येथील वृद्ध महिलेस चाकूचा धाक दाखवून जबरीने रोख रक्कम व शेळी घेऊन गेलेल्या माळेगाव, तालुका बारामती येथील 2 आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज कारवाई करत १ तासात दोन्ही आरोपिना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख ३४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे
याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
मौजे. येळेवाडी ता.माण गावच्या हद्दीत श्रीमती सिधु सर्जेराव वीरकर वय 50 वर्षे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक 05/06/2023 रोजी सकाळी 9.00 वा.चे सुमारास मौजे येळेवाडी ता.माण गावचे हद्दीतुन दोन अनोळखी इसमांनी त्याच्या जवळील काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन येवुन मला चाकूचा धाक दाखवून माझे घरातील रोख रक्कम 2000/- रुपये व घराचे समोर बांधलेली काळ्या रंगाची २७ हजार रुपए किंमतीची गाभन शेळीअसा एकूण २९ हजाराचा माल मोटारसायकलवरुन जबरीने चोरुन घेवुन गेले. म्हणुन त्या दोन अनोळखी इसमाविरुध्द तक्रार दिली होती त्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी धडाकेबाज कारवाई करत 1 तासात 1) योगेश पोपट साळुंखे 2) रवींद्र गजानन साळुंखे राहणार माळेगाव,बारामती या दोन आरोपिना अटक करुन त्यांच्याकडून रोख रक्कम काळ्या रंगाची डोक्यावर पांढऱ्या रंगाचा टिपका असलेली 2 महिन्याची गाभण असलेली शेळी व मोटारसायकल असा एकूण १ लाख ३४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईत , सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली ,पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे
, सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे, पोलीस नाईक रवींद्र बनसोड, पोलीस नाईक रवींद्र खाडे, पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर,
पोलीस नाईक प्रमोद कदम पथकात सहभागी झाले होते