बेकायदेशीर सत्तूर सारखे घातक हत्यार दहशती करिता स्वतःजवळ बाळगणाऱ्या दोन आरोपींना दहिवडी पोलिसांनी केले जेरबंद गाडी आणि घातक हत्यारांसह दोन आरोपींवर गुन्हा दाखल.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द 
दिनांक 15/05/2023 रोजी  श्री. अक्षय सोनवणे सहाय्यक पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली  23/50 वा. चे. सुमारास मौजे दहिवडी येथे अजित मेडिकल समोर दोन इसम त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलचे डिक्कीत घातक हत्यार ठेवून गाडी जवळ उभे आहेत अशी बातमी मिळाल्याने तेथे गेले असता त्यास हत्यारा संबंधी विचारले असता त्यांनी डिक्कीतून सतुर सारखे दिसणारे घातक हत्यार काढून दिले इसम नामे 1)पवन नेताजी घाडगे वय 20वर्ष राहणार बिदाल चौक दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा 2) सुमित नवनाथ ठोंबरे वय 21 वर्ष राहणार बिदाल रोड श्रीरामनगर दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा याने वरील वर्णनाचे व किमतीचे सतुर सारखे दिसणारे घातक हत्यार त्याचे ताब्याततील होंडा कंपनीची एक्टिवा स्कुटी क्रमांक एम एच 11 डीजे 3950 च्या डिक्की मध्ये मिळून आले यांच्यावर गुरनं व कलम 389/2023शस्त्र अधिनियम कलम 4,25अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. अधिक तपास तपासी अधिकारी पोलीस नाईक 243 बनसोडे करत आहेत.कारवाई पथक  अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल म्हामणे पोलीस नाईक
तुषार हंगे पोलीस कॉन्स्टेबल  रवींद्र बनसोडे पोलीस नाईक यांच्या वेळोवेळी होणाऱ्या कारवाया यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.यांचे पोलीस अधिक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक श्री बापू बांगर यांनी अभिनंदन केले

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!