दहिवडी पोलिसांनी ईन्कम रुट या कोट्यावधींचा घोटाळा व चारा छावणीमधील आरोपी एकच आहेत का याचा तपास करावा – संजय भोसले*
सध्या ईन्कम रुट ट्रेडर्स या कंपनीचे माध्यमातून माण तालुक्यातील जनतेच्या कोट्यावधी रुपयांची झालेली फसवणूक व लूट दहिवडी पोलिस का ? नजरअंदाज करत आहेत असा सवाल करतानाच या प्रकरणामध्ये पोलिस दलातील एक मोठा अधिकारी व त्याचे नातेवाईकांचा एजंट ते कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीचे गौडबंगाल उजेडात येऊ नये यासाठीचा खटाटोप सुरु आहे काय ? असा संशय जनतेतून निर्माण होत असल्याचे भोसले यांनी म्हटले आहे.तक्रारदार पोलिस स्टेशनात खेट्यावर खेटे मारुन देखील तक्रार नोंद करुण घेण्यासाठी विलंब होणे हेच सर्व काही अधोरेखित व स्पष्ट करत आहे.
*चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अकार्यक्षमपणा व जाणूनबूजून तपासातील विलंबामुळे मोकाट फिरणारे आरोपी यांचा व त्यांचे नातेवाईकांचा ईन्कम रुट या कोट्यावधींच्या घोटाळा या आणि अशा अनेक घोटाळ्यांमध्ये काय आणी कसा सहभाग आहे हे लवकरच जनतेसमोर येईल*