दहिवडी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा. ३ लाख,६४ हजार ८१० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सपोनि राजकुमार भुजबळ यांची धडाकेबाज कामगिरी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दहिवडी
दहिवडी पोलिसांनी केलेल्या जुगार अड्ड्यावरील छापा मध्ये ३ लाख ६४ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोंदवले बुद्रुक तालुका माण गावच्या हद्दीत गोंदवले म्हसवड- रोडवरील सुरेश कट्टे यांचे आमराईचे बागेमध्ये असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता.
सुरेश बाळकृष्ण कट्टे वय ४८ वर्षे राहणार गोंदवले ता माण २) शशिकांत सदाशिव खाडे वय 39 वर्षे राहणार पळशी तालुका मान ३) संभाजी रामचंद्र गोडसे वय ५४ वर्षे राहणार वडूज तालुका खटाव ४) मनोज शिवाजी बाबर वय ५३ वर्षे राहणार विटा तालुका खानापूर ५) रवींद्र सदाशिव यादव वय ३५ वर्षे राहणार दहिवडी तालुका मान ६) प्रकाश सुभाष कट्टे वय ३६ वर्षे राहणार गोंदवले तालुका मान ७) बाजीराव भीमराव जगदाळे वय ५१ वर्षे राहणार दहिवडी तालुका मान ८) सचिन दत्तात्रय शिंदे वय ४२ वर्षे राहणार खटाव तालुका खटाव ९) नवनाथ अनिल वायदंडे वय २७ वर्षे राहणार खटाव तालुका खटाव १०) विजय बागल ( पूर्ण नाव माहित नाही) ११) शिवतेज सुरेश कट्टे १२) एक अनोळखी हे जुगार खेळत असल्याचे पोलीसांना आढळून आले यांचेवर पोलीसांनी..कलम*:-८५५/२०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ४,५, १२-A प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये.३लाख ६४ हजार ८१०/- त्या मध्ये १) वन प्लस कंपनीचा मोबाईल किंमत ३०००० रुपये ,२)विवो कंपनीचा काळे रंगाचा मोबाईल २००००, ३) एक रेडमी कंपनीचा रेडमी 6 मॉडेल चा मोबाईल १००००, ४) वन प्लस कंपनीचा वन प्लस नोट मॉडेलचा मोबाईल ३००००, ५) कार्बन कंपनीचा साधा मोबाईल १००० , ६) नोकिया कंपनीचा साधा मोबाईल १०००. ७) एक विवो कंपनीचा मोबाईल २५००० ,८) एक रियल मी कंपनीचा सिल्वर मोबाईल ३००००, ९) होंडा यूनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल ७००००, १०) एक बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल ८००००., ११) एक बजाज डिस्कवर कंपनीची मोटरसायकल ५०००० ,१२) एकूण १२ प्लॅस्टिकच्या खुर्च्या ७२०० रोख रक्कम १० हजार ६१० व जुगाराचे साहित्य इ. साहित्य किंमत अंदाजे ३ लाख ६४ हजार १८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सपोनि राजकुमार भुजबळ अतिरिक्त कार्यभार दहिवडी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धोंगडे यांनी ही कारवाई केली आहे.