दहिवडी पोलीस स्टेशनला माहे ऑगस्ट 2023 चा 1 आणि माहे सप्टेंबर 2023 चे 3 असे एकूण 4 पुरस्कार प्राप्त* : दहिवडी पोलीस स्टेशन पुन्हा एकदा जिल्ह्यात नंबर वन**
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द:
ऑगस्ट आणि सप्टेंबर 2023 मध्ये दहिवडी पोलीस ठाणे यांनी महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल तसेच सर्वात जास्त मुद्देमाल निर्गती केल्याबद्दल आणि सीसीटीएनएस कार्यप्रणाली अनुषंगाने सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल बेस्ट पोलीस स्टेशन इन महिला पथदर्शी प्रकल्प तसेच बेस्ट पोलीस स्टेशन इन मुद्देमाल निर्गती आणि बेस्ट पोलीस स्टेशन इन सीसीटीएनएस असे चार पुरस्कार माननीय पोलिस अधीक्षक मा.श्री समीर शेख सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा.आंचल दलाल मॅडम यांच्या हस्ते देण्यात आला.सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे ,विलास कुऱ्हाडे, नीलम रासकर,नेहा कोळेकर,आसिफ नदाफ
यांनी केली आहे..