दहिवडी विभागाच्या निर्भया पथकाच्या प्रसिद्धी पत्रकाचे औंध येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविदयालय येथे अनावरण.*
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द:
दहिवडी उपविभागातील निर्भया पथक क्रं-५ यांचे कडून प्रसिद्धी पत्रक तयार करणेत आले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण राजा श्रीपतराव भगवंतराव महाविदयालय औंध ता. खटाव येथे दिनांक २६/०९/२०२३ रोजी करणेत आले आहे. सदर प्रसिद्धी पत्रकात समाजातील महीलांना व मुलींना आपले समाजात २४ तास निर्भयपणे वावरणेसाठी सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे “निर्भया पथक” स्थापन करण्यात आलेले असुन महीला व मुलींवर काही समाज कंटकाकडुन होणारी छेडछाड व अत्याचार रोखण्याचे काम आम्ही निर्भयापथकामार्फत करीत आहोत. कोणत्याही ठिकाणी महीला व मुलींची छेडछाड झाल्यास त्वरीत दहिवडी विभाग निर्भया पथक क्रमांक ५ मोबाईल क्रमांक ९६६५२८१०९८ वर संपर्क साधनेबाबत माहीती दिली.

सदर कार्यक्रम हा राजा श्रीपतराव भगवंतराव महाविदयालय औंध, महाविदयालयाचे सचिव श्री. कणसे सर, प्राचार्य सावंत मॅडम, उपप्राचार्य गोडसे सर, संस्थेचा शिक्षक स्टाफ तसेच मा. अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी, औंध पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. वाळवेकर व निर्भया पथकातील सदस्य यांचे उपस्थितीत पार पडला.