गोंदवले बुद्रुक हत्याकांडातील सर्व आरोपींना दहिवडी पोलिसांकडून अटक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी :प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे घडलेल्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. अनिल रघुनाथ कदम (वय ५५, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण, जि. सातारा) यांच्या खून प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय अरुण यादव, जयंत दत्तात्रय यादव आणि हर्षद दत्तात्रय यादव हे फरार होते. दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५१२/२०२४ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३, ११५(२), ३५२, ३(५) प्रमाणे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल कदम यांचा खून झाल्याबद्दलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला होता.

पुण्यातून जयंत यादवची अटक

तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे जयंत दत्तात्रय यादव (वय २३) हा पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने कारवाई करत, दहिवडी पोलिसांनी वाकड, पुणे येथे जाऊन जयंत यादवला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक केली.

दत्तात्रय यादव आणि हर्षद यादवला पकडण्यात पोलिसांना यश

या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय अरुण उर्फ अरविंद यादव (वय ५०) आणि हर्षद दत्तात्रय यादव (वय २०) हे फरार होते. घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर ते दोन दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होते. मात्र, गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दहिवडी पोलिसांनी त्यांना ७ नोव्हेंबर २०२४ रोजी पकडण्यात यश मिळवले. सदर प्रकरणातील तीनही आरोपींना आता न्यायालयीन प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कामगिरी

ही महत्त्वपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (दहिवडी विभाग) अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या कामगिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार विठ्ठल विरकर, श्रीनिवास सानप, विजय खाडे, पोलीस नाईक स्वप्नील म्हामणे, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, मल्हारी खाडे, आणि गणेश पवार यांनी परिश्रम घेतले.

गोंदवले बुद्रुक खून प्रकरणात दहिवडी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे स्थानिकांतून पोलिसांचे कौतुक होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!