दहिवडी पोलिसांची कारवाई: बेकायदा दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहिवडी
दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे जाशी (ता. माण, जि. सातारा) येथे बेकायदा देशी व विदेशी दारू विक्री करताना एका इसमाला रंगेहात पकडण्यात आले.
दि. 18 मार्च 2025 रोजी रात्री 9.15 च्या सुमारास, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर दत्तू सावंत (वय 53, रा. जाशी, ता. मान) हा आपल्या घरासमोर आडोशाला बिगर परवाना देशी व विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल गणेश भगवान खाडे (बक्कल नंबर 1355, दहिवडी पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीकडे एकूण 2,315 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. त्यामध्ये टॅंगो पंच देशी दारूच्या 12 बाटल्या, टूबर्ग बियरच्या 650 मिलीच्या 5 बाटल्या आणि 330 मिलीच्या 4 बाटल्या यांचा समावेश आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस BNSS 35(3) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
या कारवाईत सपोनी दत्तात्रय दराडे, तपास अधिकारी टी. जे. काळेल, व पोलिस अंमलदार आर. एस. गाढवे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दहिवडी पोलीस करत आहेत.