मा. पोलीस अधिक्षक साो सातारा, मा. अपर पोलीस अधिक्षक साो सातारा यांचे आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी साो वडुज यांचे मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा व कॉलेज परीसरातील रोड रोमिओ, बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालविणारे इसम, वाहन चालविणारे अल्पवयीन मुले यांचेवर एम. व्ही. अॅक्ट कारवाई तसेच महाराष्ट्र पोलीस कायदयाप्रमाणे कारवाई करणेबाबत सुचीत करण्यात आलेने
आज रोजी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एस.टी. स्टॅण्ड परीसर, दहिवडी कॉलेज दहिवडी परिसर, फलटण चौक, येथे पोलीस स्टाफसह स्पेशल ड्राईव्ह घेवुन बेशिस्त वाहन चालक, अल्पवयीन वाहन चालक तसेच रोड रोमिओवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. मोटार वाहन अधिनियम प्रमाणे व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे २५ केसेस, ३७ केसेस दाखल करून २१,०००/- रुपये दंडवसूल करण्यात आला
सदर कारवाईत दहिवडी पोलीस स्टेशनचेसहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, महिला फौजदार चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, वाहतूक पोलीस सहदेव साबळे, सागर लोखंडे, प्रकाश खाडे, प्रकाश हांगे, बापू खांडेकर, दया डोईफोडे, प्रकाश इंदलकर, तानाजी काळेल, विजय खाडे, स्वप्निल म्हामणे, नीलम रासकर, विलास घोरपडे, असिफ नदाफ, महेंद्र खाडे, निलेश कुदळे, गणेश पवार, सुधीर करचे, भामाताई काळे, पल्लवी कोळी, प्रियांका दुबळे, सुवर्णा काळे, प्रणाली सत्रे, ऋतुजा तरटे यांनी सहभाग घेतला.
सपोनि अक्षय सोनवणे :
सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचे वतीने दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की व सुचना देण्यात येते की, यापुढे नागरीकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देवु नये. मोटार वाहन अधिनियमांप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास पालकांवर दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी.