माणदेश फार्मसी कॉलेजमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव दादा कोडलकर यांना अडवले; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी):
माणदेश इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर, म्हसवड येथे संस्थेचे संस्थापक सचिव दादा कोडलकर यांना त्यांच्या केबिनमध्ये जाण्यापासून अडवून दमदाटी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना दिनांक 16 जुलै 2025 रोजी दुपारी 1.45 वाजता घडली. दादा धोंडीबा कोडलकर (वय 34, रा. भाटकी, ता. माण, जि. सातारा) हे संस्थेचे संस्थापक सचिवअसून, ते कॉलेजच्या केबिनमध्ये जात असताना, आरोपी विवेकानंद श्रीरंग माने, सुशांत प्रकाश पाटील व महेश जालिंदर माने (सर्व रा. वडूज, ता. खटाव) यांनी संगनमत करून केबिनच्या दरवाजाला लोखंडी साखळी व दुसरे लॉक लावून त्यांना अडवले.
“तुमचे कॉलेजमध्ये काही काम नाही, तुम्ही केबिनमध्ये जाऊ शकत नाही” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकारामुळे कोडलकर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 237/2025 नुसार BNS कलम 126(2), 351(2), 351(3), 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार एन. एन. पळे करत आहेत.