श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात ‘सायबर क्राइम’ विषयावरील कार्यशाळा संपन्न
म्हसवड : येथील फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालयात, समान संधी केंद्र, महिला तक्रार निवारण, राष्ट्रीय सेवा योजना व अग्रणी योजना व आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने. ” सायबर क्राईन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात होते कार्यक्रम दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून म्हसवड येथील अॅड. स्मिता राऊत व अँड. ऐश्वर्या तिवाटणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य. डॉ. कदम एस टी उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीस समान संधी अंतर्गत कॉलेजमधील विद्यार्थ्याना वही वाटप करण्यात आले (तिन्ही शाखांच्या) प्रथम सत्रात अॅड राऊत मॅडम यांनी मुलींना सोशल मिडिया संदर्भातील वापर व सायबर गुन्हे या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. व सायबर गुन्हा अंतर्गत कौटुंबिक हिंसाचार, स्त्रियांच्या वरील अत्याचार, एकतर्फी प्रेमातून हत्या, विकृत फोटो सोशल मिडियावर अपलोड करणे, बलाल्कार यांसारखे सायबर गुन्हे
व त्या विरोधातील न्यायालयीन कायदयांचा सविस्तर आढावा घेऊन विद्यार्थ्याना अनमोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये ॲड. ऐश्वर्या तिवाटणे यांनी इंन्टेलेक्च्युअल प्रॉपर्टी अंतर्गत कॉपी राईट ,ट्रेडमार्कस्,डिझाईन ,पेटेंन्ट. यांसारख्या विषयांचा आढावा घेतला , अध्यक्षीय भाषणात . आयक्युएसी चे प्रमुख प्रा. रणवरे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मिडिया अंतर्गत येणारे व जगण्या साठी भयावह असणाऱ्या परिस्थितीचा उलघडा करून जीवनाचे सत्य सांगितले.
अग्रणी कॉलेज चे प्रमुख प्रा. डॉ. जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले प्रास्ताविक प्रा. अँड. राजू भोसले यांनी केले. प्रा. सावंत मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमांसाठी एन एस एस. चे प्रमुख प्रा. शिखरे ,समान संधीचे प्रमुख प्रा. पवार आर.जे प्राध्यापिका डॉ. कु. चव्हाण जे. एस, डॉ.मुल्ला एस. ए , . डॉ. देशमुख एस्.व्ही. प्रा. अंजली माने प्रा. तांबोळी एन.बी. डॉ. सोनवणे प्रा. क्षिरसागर , प्रा. सावंत . डॉ. बोबडे व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.