व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत,महादेवमळा येथे माणगंगा नदीच्या काठावर अवैध हातभट्टीची दारू तयार करताना आरोपी सखाराम महादेव जाधव (वय 45 वर्षे, रा. म्हसवड) यास पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 65 (क)(ड)(ई) अंतर्गत या गुन्ह्यात आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल विलास वाघमोडे यांनी गुरुवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. छाप्यात आरोपीकडे एकूण 23,250 रुपये किंमतीचा अवैध माल जप्त करण्यात आला.
जप्त मालामध्ये 200 लिटरच्या लोखंडी बँलरमध्ये 200 लिटर तयार दारू, 105 लिटर प्रमाणे पत्र्याचे 15 डब्बे, तसेच 400 लिटर अम्लयुक्त रसायनाचा समावेश आहे. या सर्व गोष्टी हातभट्टीद्वारे दारू तयार करण्यासाठी वापरल्या जात होत्या.
सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक लुबाळ अधिक तपास करत आहेत