पीएचसी मानकी येथे सीपीआर प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
इम्रान मुल्ला
माळशिरस (प्रतिनिधी)

प्राथमिक आरोग्य केंद्र, मानकी (ता. माळशिरस) येथे नुकतेच सीपीआर (कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन) या जीवनावश्यक प्राथमिक उपचार तंत्राबाबत एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या प्रशिक्षणाचा उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रकारे सीपीआर देण्याची माहिती आणि कौशल्य प्राप्त करून देणे हा होता.

या प्रशिक्षणाला पीएचसी मानकीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माने देशमुख सर व डॉ. सय्यद मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यासोबतच आरोग्य पर्यवेक्षक कावळे, एलएचव्ही गवळी, तसेच सर्व उपकेंद्रांचे आरोग्य सेवक, सेविका, आशा सुपरवायझर व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रशिक्षणादरम्यान डॉ. देशमुख व डॉ. सय्यद यांनी सीपीआरचे महत्त्व, ते कोणत्या प्रसंगी द्यावे, कसे द्यावे, तसेच सीपीआर देताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रत्यक्ष सीपीआर पद्धती दाखवण्यात आली, तसेच उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.

संपूर्ण प्रशिक्षण अतिशय उपयुक्त, समजण्यास सोपे व प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आले. उपस्थितांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेत पुढे गावपातळीवर याचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला.

आरोग्य यंत्रणेमार्फत वेळोवेळी अशा प्रशिक्षणांचे आयोजन होणे गरजेचे असून, आपत्कालीन प्रसंगी जीव वाचवण्यासाठी अशा कौशल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे या उपक्रमातून स्पष्ट झाले.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!