ऊस तोडीच्या पैशाच्या वादातून चुलत्याचा खून; पुतण्याला जन्मठेप

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक: अहमद मुल्ला)
म्हसवड:
ऊस तोडीच्या पैशाच्या कारणावरून चुलत्याचा खून करणाऱ्या पुतण्याला वडूज येथील अति. जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदीप वसंत चव्हाण (वय 28, रा. कारंडेवाडी, ता. मान, जि. सातारा) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.

घटनेचा तपशील:
ही घटना 19 मे 2020 रोजी पहाटे तीनच्या सुमारास कारंडेवाडी (कुकुडवाड) येथे घडली. आरोपी संदीप चव्हाण याचे त्याच्या चुलता लक्ष्मण अण्णा चव्हाण (वय 49) यांच्यासोबत ऊस तोडीच्या पैशावरून वाद झाले. त्यानंतर संतप्त झालेल्या संदीपने लक्ष्मण चव्हाण यांच्यावर झोपलेल्या अवस्थेत घरातील मटण कापण्याच्या सुऱ्याने वार करत त्यांचा खून केला.

Oplus_16908288

या घटनेनंतर म्हसवड पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून आवश्यक वैद्यकीय पुरावे गोळा केले. कसून तपास करून आरोपीविरुद्ध वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अजित प्रताप कदम (साबळे) यांनी युक्तिवाद केला. आठ साक्षीदारांच्या जबाबांसह कागदोपत्री व वैद्यकीय पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी संदीप चव्हाण याला कलम 302 अन्वये जन्मठेप व 5,000 रुपयांचा दंड, तसेच दंड न भरल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

या खटल्याच्या यशस्वी निकालासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, म्हसवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉसिक्युशन स्क्वॉडमधील पो.उप.नि. दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. विजयालक्ष्मी दडस, पो.कॉ. सागर सजगणे, पो.कॉ. अमीर शिकलगार, पो.कॉ. जयवंत शिंदे यांनी उल्लेखनीय मेहनत घेतली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!