लोकशाहीच्या चौथ्या खांबांचे रक्षणकर्ते म्हणून पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे : इंजि सुनील पोरे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड येथील इंजि सुनील पोरे यांचे कुटुंबीयांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन आपल्या सुवर्ण बाग येथे सर्व पत्रकारांचा सपत्निक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते इंजि.सुनील पोरे यांचे सर्वच पत्रकारांशी जिव्हाळ्याचे नाते असून प्रेमसंबधाचे नाते जपत दर वर्षी पत्रकारांचा संन्मान करत असतातच गत वर्षाप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी पत्रकारा़ना सपत्निक आमंत्रित करून त्यांना शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला


या वेळी म्हसवड शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते या पत्रकार सम्मान कार्यक्रमात इंजि.सुनील पोरे बोलत होते ते पुढे म्हणाले पत्रकार आपल्या परखड लेखनीतून समाजाचे प्रश्न मांडत असतो त्यांच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे दिसून येते लोकशाहीच्या चौथ्या खांबांचे रक्षणकर्ते म्हणून त्यांचे योगदान मोलाचे आहेअशा पत्रकारांचा सम्मान करणे हे आमचे कर्तव्यच असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचे समाजात होत असले कौतुक त्यांच्या पत्नीलाही समजावे त्यांचाही मानसम्मान व्हावा या उद्देशाने यावर्षी देखील पत्रकारांचा सपत्नीक सम्मान करण्याचे आम्ही पोरे कुट्ंबीयांनी ठरवले या निमित्ताने सर्व पत्रकारांची देखील एकमेकाच्या कुटुंबाशी चांगल्या प्रकारे ओळखी होऊन आपुलकीचे संबध निर्माण होण्यास मदत होतं आहे


यावेळी बोलताना सौ.सुवर्णाताई पोरे म्हणाल्या प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रिचा हात असतो तर पत्रकाराच्या चांगल्या कार्यामागे त्यांच्या पत्नीचाही मोठा हातभार असतो तर अशा प्रसंगी पत्रकाराच्या पत्नीचा देखील त्यांच्या बरोबर सत्कार झाला पाहिजे त्याना आपल्या पतीचे समाजाकडून होणारे कौतुक पहाण्याची संधी मिळाली पाहिजे या आनंदात त्यांनाही सहभागी करुन घेतले पाहिजे या उद्देशानेच आम्ही सर्व पत्रकाराना आमंत्रित केले आहे त्यानुसार सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले त्या बद्दल सर्वांचे आभार यावेळी पत्रकारांबद्दल बोलताना सौ. सुवर्णाताई म्हणाल्या पत्रकारांनी आपली लेखणी चालवताना समाजाचे प्रभोधन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे आपल्या लेखणीतून समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल असे लेखन न करता संकट प्रसंगी धीर देण्याचे काम लेखणीतून झाले पाहिजे उगाच तेलमीठ लावून बातमी न छापता योग्य तीच बातमी प्रसारित करावी


यावेळी जेष्ठ पत्रकार विजय टाकणे यांनी पत्रकार दिनाचे महत्व सांगुन पोरे कुटुबियांचे कौतुक करुन त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती सांगीतली सुनील पोरे यांनी सातारा -पंढरपूर रस्त्यासाठी केलेले आंदोलन, शेतीच्या पाणी प्रश्नासाठी केलेले आंदोलन, कोविड काळात नागरिकांसाठी केलेली मदत इत्यादी सामाजिक कार्या याबद्दलची माहिती सांगून त्यांच्या या सामाजिक कार्यात पत्रकार त्यांच्या बरोबर होते आणि त्याच्या पुढील राजकीय कारकिर्दीत देखील सर्व पत्रकार त्यांच्या बरोबर असतील असे आश्वासन दिले यावेळी पत्रकार विठ्ठल काटकर यांनी देखील इंजि. सुनील पोरे यांच्या निरपेक्ष सामाजिक कार्याची प्रशंसा करून आगामी काळात येऊ घातलेल्या नागराध्यक्ष पदाच्या निडणुकीसाठी तयार राहावे जनता आपल्या पाठीशी आहेच आम्ही सुद्धा आपल्या सारख्या प्रामाणिक नेत्याला सर्वतोपरी साथ देऊ असे आश्वासन दिले

यावेळी पत्रकाराच्या सौभाग्यवती डॉक्टर सौ.सोफिया मुल्ला मॅडम यांनीही इंग्रजी, मराठी आणि हिंदीतुन आपले मनोगते व्यक्त करुन पोरे कुटुंबानी केलेल्या या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी इंजि.सुनील पोरे , युवा नेते करण पोरे अ्ॅड.शुभम पोरे जेष्ठ पत्रकार विजय टाकणे ,दिलीप किर्तने, एल के सरतापे, विठ्ठल काटकर, अहमद मुल्ला, बापूराव मिसाळ, सचिन मंगरुळे, महेश कांबळे, पोपट बनसोडे, शंकर पानसांडे, लुनेश विरकर, सुशिल त्रिगुणे, धनंजय पानसांडे आदी पत्रकार सपत्नीक उपस्थित होते युवा नेते करण पोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अॅड.शुभम पोरे यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानले

 बाळासाहेब पिसे बाबुभाई मुल्ला सागर नामदे निखिल माळी विशाल गोंजारी गणेश घोडके आदीनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!