शासनाच्या जलसंधारणाच्या योजनेत अहिंसा पतसंस्थेचे योगदान- नितिन दोशी* चित्र रथाची  झेंडा दाखवून सुरुवात

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड 
म्हसवड
    महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय जैन संघटना कार्यतत्पर असून शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी चित्ररथ तयार करून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून हा चित्ररथ तयार करून भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून हा चित्ररथ गावोगाव फिरवला जात असून त्यासोबत माहितीपत्रक ही वाटली जात आहे
   या चित्ररथाची सुरुवात म्हसवड येथून माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्था चेअरमन नितीन भाई दोशी यांनी श्रीफळ वाढवून व सहकाराचा झेंडा दाखवून केली
     यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन दोशी म्हणाले भारतीय जैन संघटनेचे कार्य सातारा जिल्ह्यात भरतेश  शेठ गांधी यांचे नेतृत्वाखाली चांगले पद्धतीने सुरू असून भारतीय जैन संघटनेने या नव्या जलसंधारणाच्या योजनेत पुढाकार घेतला असून ती यशस्वी करण्यासाठी अहिंसा पतसंस्थेच्या सौजन्याने गावोगावी चित्ररथ फिरवण्यात येणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेची माहिती होणार आहे तलावातून गाळ निघाल्याने जलसाठे वाढणार आहेत सदरचा गाळ शिवारात टाकल्याने शेती सुधारणा होणार आहे त्यामुळे याचा लाभ प्रत्येक गावांनी घ्यावा असे आव्हान यावेळी नितीन दोशी यांनी केले
     यावेळी उपस्थिती पतसंस्थेचे संचालक महावीर होरा ,प्रीतम शहा ,राजेश शहा, व्यवस्थापक  दीपक मासाळ म्हसवड शहर जैन संघटनेचे अध्यक्ष प्रवीण जोशी, संतोष दोशी ,शशीकिरण देशमाने अमर कवडे व पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!