काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा म्हसवड मध्ये साखर वाटप व फटाके वाजवून जल्लोष
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :
राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली व त्यांची रद्द करण्यात आलेली खासदार कि परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्या बद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते रणजीत भैय्या देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड येथे साखर वाटप व फटाके वाजवून आनंद साजरा केला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून खूप मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांना याप्रकरणी अहमदाबाद हायकोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. विशेष म्हणजे सुरत सेशन्स कोर्ट, सूरत डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनीदेखील ही शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या होत्या. राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्याने त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती. अहमदाबाद हायकोर्टाच्या या निकालाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावर सुनवाणी सुरु होती. अखेर या प्रकरणी राहुल गांधी यांच्यावरील शिक्षेला सुप्रीम हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर म्हसवड येथे साखर वाटप व फटाके वाजवून आनंद साजरा केला
सच्चा ई कभी झुक नहीं सकती राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा प्रकारे घोषणा देत सर्व सामान्य जनतेने आनंद व्यक्त केला
त्या वेळी माण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाबासाहेब माने, माण तालुका अल्प संख्याक सेलचे अध्यक्ष गब्बारभाई काझी, नानासाहेब राजमाने, शैलेश गांधी व सर्व काँग्रेस प्रेमी जनता उपस्थित होती