व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – सुशील यादव
म्हसळा नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष,शिवकृपा पत संस्थेचे चेअरमन,महाराष्ट्र यादव चॅरीटी ट्रस्ट म्हसळा तालुका शाखा अध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या मातोश्री मुक्ताबाई बाळु कांबळे यांचे वृद्धापकाळाने म्हसळा गौळवाडी निवासस्थानी दुःखद निधन झाले.
निधनासमयी त्यांचे वय ९० वर्षे होते.त्यांचे पश्चात तीन मुलगे,मुलगी,सुना,जावई,नातवंडे आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.सामान्य शेतकरी कुटुंबातील मनमिळावू मुक्ताबाई यांनी त्यांचे कार्यकाळात काबाडकष्ट करून मुलांना उच्चशिक्षित करून व्यवसाय उद्योग तसेच सामाजिक,राजकिय क्षेत्रात कार्यरत करून त्यांचे नाव उज्वल केले.मुक्ताबाई यांचे निधनाचे वृत्त समजताच दिलीप कांबळे यांचे सामाजिक,राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.