हिंदू धर्माची निंदा, ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव महिले विरोधात गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज संपादक:अहमद मुल्ला
म्हसवड, (प्रतिनिधी) –
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी धनाजी गोपाळकृष्ण माने (वय २६, व्यवसाय – शेती, जात – मराठा, धर्म – हिंदू, रा. म्हसवड) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या राहत्या घरी येऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास सांगण्यात आले.
२ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी यांच्या घरात येऊन श्रीमती सविता दत्तात्रय जाधव (वय ५६, धर्मांतरित ख्रिश्चन, रा. म्हसवड, ता. माण) यांनी, “हिंदू धर्म खोटा आहे. घरातील सर्व देव-देवतांचे फोटो व मूर्ती काढून टाका. पूजा करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होईल. तुम्ही ख्रिश्चन धर्म स्वीकारा, येशूची प्रार्थना करा,” असे म्हणत हिंदू धर्म व श्रद्धांचा अपमान केला, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकारामुळे फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर म्हसवड पोलीसांनी गु.र.नं. 220/2025 अन्वये BNS कलम 299, 302 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार पळे करत आहेत.