माजी सैनिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी ठोस पाऊल पाटण दौलतनगर येथे मंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला 

 

कुलदीप मोहिते 

कराड :-प्रतिनिधी 

पाटण दौलतनगर येथे शुक्रÚgवार, दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री यांची सैनिक फेडरेशन माजी सैनिक संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. या भेटीत प्रशांत कदम (राज्य उपाध्यक्ष, माजी सैनिक) यांनी कराड व सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद जवानांच्या कुटुंबीयांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनात कराड मिलिटरी बॉईज हॉस्टेल परिसरातील दैनंदिन अडचणी, पायाभूत सुविधा, आर्थिक तरतुदी व सन्मानास्पद सवलती यावर भर देण्यात आला. विशेषतः हॉस्टेलकडे जाणाऱ्या अतिशय खराब रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची ठाम मागणी करण्यात आली. तसेच हॉस्टेल परिसराच्या दुरुस्तीसाठी व ओपन जिम उभारणीसाठी जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, मेस्को (महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ) मध्ये कार्यरत माजी सैनिकांच्या वेतनवाढीचा प्रश्न, मेघा हायवेवर माजी सैनिकांना टोल सवलत, तसेच शहीद जवानांच्या स्मारकांच्या उभारणी व संवर्धनासाठी आर्थिक मदत याबाबत स्पष्ट मागण्या मांडण्यात आल्या.

कराड येथे सैनिक भवन उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून शासकीय निधीतून बांधकाम करण्याची मागणीही महत्त्वाची ठरली. यामुळे CSD कॅन्टीन, ECHS पॉली क्लिनिक एका छताखाली येऊन वयोवृद्ध सैनिकांना मोठा दिलासा मिळेल; शिवाय तालुक्यातील शहीद जवानांची यशोगाथा युवा पिढीसमोर येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

तसेच दि. 22 फेब्रुवारी रोजी सातारा येथे होणाऱ्या महा सैनिक मेळाव्यास उपस्थित राहून सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली.

या सर्व मागण्यांवर मंत्री शंभूराजे देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
या वेळी नि. सुभेदार सदाशिव नागणे (कराड तालुका अध्यक्ष), माजी सैनिक श्रीरंग कदम, शहीद जवानांचे वीरपुत्र सूरज जगताप तसेच अनेक माजी सैनिक उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *