क्रांतिवीर शाळेत विद्यार्थ्यांना संगणक कोडिंग शिक्षण.

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड.. प्रतिनिधी
भविष्यातील आव्हानाला पेलण्यासाठी सक्षम शालेय पिढी घडवण्याचा आधुनिक संगणक कोडिंग शिक्षण उपक्रम क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेत राबवला जात असून त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
म्हसवड येथील क्रांतिवीर नागनाथ नायकवडी शाळा ही एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जात आहे. या शाळेत सुसज्ज संगणक प्रयोगशाळा असून त्याद्वारे विद्यार्थी व संगणक यांचे नाते शिक्षणाच्या माध्यमातून घट्ट झालेले आहे. कोडिंग ही संगणक प्रणालीची भाषा असून त्याद्वारे विविध शैक्षणिक संकल्पना साध्य केल्या जात आहेत.


मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या दूरदृष्टीतून शाळेतील सुसज्ज संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे आधुनिक दालन उपलब्ध झालेले आहे. संगणक कोडिंग उपक्रमामुळे विद्यार्थी संगणक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी सक्षम बनत असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. कोडिंग उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये संगणक समस्या निराकरण कौशल्यात वाढ होत आहे तसेच कल्पनाशक्तीला वाव मिळत असल्याने विविध संगणक उपक्रम सहजपणे राबवण्यास मदत होत असल्याचे संगणक शिक्षिका अक्षया आटपाडकर यांनी स्पष्ट केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!