व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
अरुण जंगम, म्हसळा (रायगड)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रणित वरदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने म्हसळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप उपक्रमाची पूर्तता करण्यात आली आहे. खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री आणि श्रीवर्धन मतदार संघाच्या आमदार आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या पुढाकाराने विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वरदा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने मतदार संघातील म्हसळा,श्रीवर्धन,तळा,माणगाव तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या मुलामुलींना तब्बल १० हजार सायकलींचे वाटप करण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला होता.
श्रीवर्धन येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. प्रारंभी म्हसळा तालुक्यात २ हजार सायकलींचे वाटप करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीनंतर आता उर्वरित सायकलींचे वितरण करून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.
खामगाव पंचक्रोशीत खामगाव, आंबेत, पांगलोळी, संदेरी, पाष्टी तसेच मेंदडी पंचक्रोशीत मेंदडी स्कूल, पीएनपी काळसुरी, खरसई, गोंडघर आणि अंजुमन शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता ८ वी ते १० वीतील एकूण ३५० विद्यार्थ्यांना सायकली वितरित करण्यात आल्या.
या उपक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. मेंदडी हायस्कूल येथे आयोजीत सायकल वाटप कार्यक्रमाला आमदार आदिती तटकरे यांचे स्विय सहाय्यक अनिकेत पवार,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,माजी सभापती बबन मनवे, माजी सभापती छाया म्हात्रे,राष्ट्रवादी काँग्रेस युवा कार्यकर्ते जमीर नजीर,मेंदडी हायस्कूल चेअरमन हर्षद नजीर,व्हाइस चेअरमन मोरेश्वर पाटील,सल्लागार नवनीत पारेख,गट विकास अधिकारी माधव जाधव, गट शिक्षण चव्हाण,लहूशेट म्हात्रे,महीला अध्यक्षा सोनल घोले,तालुका अध्यक्षा मिना टिंगरे,महेश घोले, सल्लागार मधुसुधन पाटील,अनिल टिंगरे,मधुकर पाटिल, मधुकर कांबळे,सुनिल लाखन,रमेश डोलकर, वारल सरपंच कवीता पेरवी,प्राचार्य प्रमोद चालके, शिक्षक मेघशाम लोणशिकर,तेजस कांबळे, विध्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकल वाटप उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.