आत्महत्येने गावात खळबळ: पांगरी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

दहिवडी : (प्रतिनिधी):

दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सुमारे 6:00 वाजता पांगरी (ता. माण) गावात एक दुर्दैवी घटना घडली. 19 वर्षीय ऋषिकेश संतोष जगदाळे या युवकाने त्यांच्या राहत्या घरात लोखंडी अँगलला रशीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच ऋषिकेशचे काका रोहित मानसिंग जगदाळे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास सपोनी.अक्षय सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खाडे करत आहेत.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!