आंबेडकर नगर वस्ती ,हिंगणोळे (उंब्रज) येथे नागरी सुविधा मिळावी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला

कुलदीप मोहिते
उंब्रज :- प्रतिनिधी
आंबेडकर नगर वस्ती ,हिंगणोळे (उंब्रज) येथे नागरी सुविधा मिळावी अशी मागणी आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या कडे केली आहे,

या बाबत सविस्तर माहिती अशी की आंबेडकर नगर वस्ती , वॉर्ड क्रमांक 1 हिंगणोळे (उंब्रज)
आंबेडकर नगर वस्ती ,हिंगणोळे (उंब्रज) येथिल वस्ती मध्ये आमच्या समाज बांधवांच्या साठी सांस्कृतिक भवन , स्मशानभूमी सुशोभीकरण करणे,स्ट्रीट लाईट, महिलांच्या साठी स्वच्छता ग्रह,
या सोयीची नितांत आवश्यकता आहे तरी आपण आमच्या वस्ती साठी वरील सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात ,
हिंगणोळे येथील युवा कार्यकर्ते राकेशराज थोरात हे गेली कित्येक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून या विभागात काम करत आहेत.
आंबेडकर वस्ती मध्ये कित्येक दिवसापासून अनेक नागरी सुविधा मिळाल्या नाहीत तरी आपण आमच्या मागणीचा विचार करावा अशी मागणी हिंगणोळे येथील युवा कार्यकर्ते राकेशराज थोरात ,योगीराज सरकाळे,तानाजी काटकर, यांनी केली आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *