नागरीकांनी उद्योजिका महिला महोत्सवाला भेट देऊन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा: डॉ.सचिन माने
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवडकर नागरीकांनी उद्योजिका महोत्सवामध्ये वस्तू खरेदी करुन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी व्यक्त केले.
महिला व बालविकास योजनेंतर्ग म्हसवड पालिका हद्दीतील सर्व महिलांसाठी म्हसवड पालिकेच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योजिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, या महोत्सवामध्ये शहरातील ५० हुन अधिक महिलांनी सहभागी होत या महोत्सवाची शान वाढवली आहे, आता म्हसवडकर नागरीकांनी ही आपली जबाबदारी म्हणुन महोत्सवामध्ये विविध वस्तू खरेदी करुन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा असे आवाहन म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी व्यक्त केले.

म्हसवड पालिकेच्या वतीने आयोजीत महिला उद्योजिका महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, यावेळी पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा विभुते, शितल गुजर, पवार मँडम, आयडीबीआयच्या पाटील मँडम आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ माने यांनी सांगितले की गतवर्षी म्हसवड पालिकेच्या वतीने अशाच प्रकारे महिला उद्योजिका महोत्सवाचे आयोजन केले होते त्यावेळी सहभागी महिला उद्योजिकांना यामध्ये चांगला व्यावसाय झाला यामुळे महिलांच्या घरगुती व्यावसायाला चालना मिळाली आहे. यंदा या महोत्सवाची मागणी महिलावर्गातुन मोठ्या प्रमाणावर पालिकेकडे झाली मात्र गतवेळी हा महोत्सव मार्च महिन्यात घेण्यात आला होता, यंदा नागरीकांच्या मागणीनुसार दिवाळीच्या पुर्वी अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, या महोत्सवामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करीत असल्याचे डॉ. माने यांनी शेवटी सांगितले.
दि.३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर याकाळात म्हसवड पालिकेच्या वतीने महिलांसाठी उद्योजिका स्टॉलचेही आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल महिलांनी लावले आहेत, या स्टॉलमधुन म्हसवडकर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करुन स्टॉल धारक महिलांचा उत्साह वाढवावा असे आवाहन म्हसवड पालिकेच्या लेखाधिकारी कु.शितल गुजर यांनी केले आहे.
तर यामध्ये सहभागी होणाऱ्या स्टॉल धारक महिलांना पालिकेच्या वतीने येथील बाजार पटांगण येथे मोफत स्टॉल उभारणी करुन दिली असुन त्यासाठी लागणारे विजेची सोय, पिण्याचे पाणी यासह अन्य मदतही पालिकेच्या वतीने मोफत दिली आहे. या स्टॉलधारकांतुन प्रथम, द्वितीय व तृतीय असे ३ क्र. काढले जाणार असुन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे तर सहभागी महिलांचाही प्रशस्तीपत्र देवुन सन्मान केला जाणार असल्याचे पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी सुवर्णा विभुते यांनी सांगितले. गणेश म्हेत्रे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले