देवापुर गावचे नागरीकांनी दिघंची ता.  आटपाडीच्या सराफाला  लुटणाऱ्या तीन अट्टल चोरट्याना पकडून म्हसवड पोलीसांच्या ताब्यात दिले म्हसवड पोलीसांनी चोरट्याकडून दिड लाखाचे दागीने जप्त केले 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड 
देवापुर गावातील नागरीकांनी दाखवलेल्या समय सुचकतेमुळे व प्रसगावधानामुळे दिघंची ता. आटपाडी येथील सराफाला    लुटणाऱ्या तीन अट्टल चोरट्याना पकडून म्हसवड पोलीसांच्या ताब्यात दिले     पोलीसांनी त्यांना जेरबंद केरुन  सदरच्या  चोरट्याकडून १ लाख ५०हजार रुपयाचे चांदीचे दागीने जप्त केले  त्यामुळे म्हसवड परिसरातुन देवापुरच्या नागरीकांचं कौतुक करण्यात येत आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत- दिनांक ०७/०६/२०२३ रोजी ७.३० वा चे दरम्यान देवापुर गावचे पोलीस पाटील  बनसोडे यांनी सपोनि  भुजबळ   यांना फोनद्वारे कळविले कि, दिघंची ता.आटपाडी जि सांगली येथे सोने चांदि व्यापारी यांना लुटणारे तीन संशयित इसम यांना देवापुर गावचे नागरीकांनी पकडलेले आसल्याचे कळविलेने, सदर प्रकाराचे गांभिर्य लक्षात घेवुन सपोनि राजकुमार भुजबळ सो, म्हसवड पोलीस स्टेशन यांनी  समिर शेख , पोलीस अधिक्षक  सातारा व  बापू बांगर , अप्पर पोलीस अधिक्षक  सातारा, . अश्विनी शेंडगे  उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कैम्प वडूज यांना अवगत करून मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली घटणेचे गांभीर्य लक्षात घेवुन तात्काळ देवापुर या ठिकाणी म्हसवड पोलीस ठाणेकडील पो.उ.नि विशाल भंडारे  पो हवा. कु-हाडे , पो ना नारनवर , पो ना धुमाळ , पो ना चव्हाण , पो कॉ काकडे , पो कॉ शिरकुळे , पो कॉ भादुले , पो कॉ दुबळे  असा पोलीस स्टाफ घटणास्थळी पाठवुन देवून सोने चांदी व्यापारी यांना लुटणारे तीन अट्टल चोरटे यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांची नावे गावे विचारुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) हनुमंत रमेश नांगरे वय २३ वर्षे रा करगणी ता आटपाडी जि. सांगली २) संतोष तुकाराम होणमाने वय २६ वर्षे रा करगणी ता आटपाडी जि सांगली ३) संग्राम दंत्तत्रय खिलारे वय २१ वर्षे रा करगणी ना आटपाडी जि. सांगली अशी असल्याची सांगुन त्यांनी दिघंची ता आटपाडी जि सांगली गावचे जवळ सोने  चांदी व्यापारी यांचेकडील चांदीचे दागीने चोरलेची कबुली दिली. नमुद अंदाजे १५०,०००/- रु किमतीचा  चांदीचा मुद्देमाल | त्यांचेकडे मिळुन आल्याने संबंधीत सोने चांदी व्यापारी बोलावून घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बाबु हणमंत जगताप वय ४० वर्षे रा राजेवाडी ता आटपाडी जि सांगली असे असल्याचे सांगुन आज रोजी संध्याकाळी ७.०० वा.चे सुमारास दिघंची ता आटपाडी जि सांगली येथून त्यांचे सोने चांदीचे दुकान बंद करून चांदीचे साहित्य सोबत घेवुन घरी जात असताना दिघंची ता आटपाडी जि सांगली गावचे पुढील ओढ्याजवळ गेले असता त्याठिकाणी त्यांचे पाठीमागुन मोटरसायकलवरुन तीन इसम येवुन त्यांनी डोळ्यामध्ये तीखट मीरची पावडर टाकुन आडवून त्यांचेकडील सुमारे १,५०,०००/- रुपये किंमतीची चांदीचे दागीने असलेली बॅग हिसकावून घेवुन मोटरसायकल वरुन निघून गेल्याचे सांगुन आरोपीकडे मिळुन आलेला चांदीचा मुद्देमाल हा त्यांचाच आहे असे सांगीतले आहे. सदरचा जबरी चोरीचा प्रकार हा आटपाडी पोलीस ठाणे जि सांगली हद्दीत घडलेला असल्याने नमुद आरोपी मिळुन आलेला चांदिचा सर्व मुद्देमाल हा आटपाडी पोलीस ठाणे जि सांगली यांचे ताब्यात देण्यात आलेला असुन पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे जि सांगली हे करित आहेत. देवापुर गावातील नागरीकांनी दाखवलेल्या समय सुचकतेमुळे व प्रसांगवधानामुळे सदरचे चोरटे पोलीसांना जेरबंद करता आलेले आहेत. त्यामुळे म्हसवड परिसरातुन देवापुर नागरीकांचं कौतुक करण्यात येत आहे.
सदरच्या कारवाई मध्ये  समिर शेख  पोलीस अधिक्षक  सातारा सपोनि राजकुमार भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक  बापु बांगर सो अपर पोलीस अधिक्षक  सातारा . अश्विनी शेंडगे  उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प बहुज म्हसवड पोलीस ठाणे . विशाल भंडारे पोलीस उपनिरीक्षक म्हसवड पोलीस ठाणे पो. हवा. कु-हाडे व , पो ना नारनवर , पो. ना. धुमाळ  , पो.ना. चव्हाण , पो कॉ काकडे , पो कॉ भादुले , पो कॉ शिरकुळे , पो कॉ दुबळे , पळसावडेचे पोलीस पाटील भाउसाहेब चव्हाण सहभागी झाले होते

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!