क्रांतिवीर संकुलात चिमुकल्यांचा दिंडी सोहळा उत्साहात.
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड. .. प्रतिनिधी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी पंढरीच्या विठ्ठल रुक्माई च्या वारी निमित्त म्हसवड येथे दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात साजरा केला.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत च्या क्रांतिवीर नागनाथांनअण्णा नायकवडी शाळा म्हसवड, क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम स्कूल, क्रांतीवीर जुनियर कॉलेज, नूतन मराठी शाळा,तसेच आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वारकरी दिंडी उपक्रम साजरा केला.यानिमित्ताने सजवलेल्या पालखीत विठ्ठल रुक्माई ची मूर्ती बसवून शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात रिंगण सोहळा आयोजित केला होता.संकुलातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पारंपरिक पोशाख परिधान केले होते.टाळ मृदुंग व अभंगाच्या गायनामुळे संकुलातील विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा जोश निर्माण झाला होता.वारकऱ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण पेहराव, विठ्ठल रुक्मिणीचा जयघोष, शाळेतील शिक्षिका व मुलीनी फुगडी खेळून, अभंगाचा जयघोष करून,वारकरी दिंडी उपक्रम उत्साहात साजरा केला.यानिमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थी वारकऱ्यांना संस्थेतर्फे गोडधोड चा प्रसाद देण्यात आला .विद्यार्थ्याबरोबरच पालक शिक्षक ही या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे पारंपरिक रूढी परंपरा ,तसेच वारकरी सांप्रदायाचा वासा व वारसा याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
उपक्रमशील असणाऱ्या क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात राबवलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे उपस्थित पालक समाधान व्यक्त केले.