मुलांना शालेय जीवनात गणितीय क्रिया व व्यवहार ज्ञान समजावे यासाठी जिल्हा परिषद शाळा दिडवाघवाडी येथे बालबाजार पार पडला.
सुरुवातीला गावच्या प्रथम नागरिक दिडवाघवाडी गावच्या सरपंच सौ. सविता संजय दिडवाघ, दिडवाघवाडी गावचे पोलीस पाटील संतोषराव सरगर ,व प्राथमिक शिक्षक सह.बँकेचे व्हाईस चेअरमन विजय बनसोडे व पै.संजय बाबा दिडवाघ व संजय दिडवाघ यांच्या उपस्थिती मध्ये श्रीफळ व फीत कापून बालबाजाराचे उद्घाटन करण्यात आले.
या बाजारात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या फळे खाऊचे पदार्थ विक्रीस मांडले होते. गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे बाजारात फेरफटका मारून विविध भाज्या,पदार्थ खरेदी करून विद्यार्थ्यांना दाद दिली. .बाल बाजारात तब्बल सात हजार तीनशे एकतीस रूपयाची उलाढाल झाली असून मुलांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळाले.या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले असून परिसरातील शिक्षक वर्ग खरेदीसाठी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपक्रमशील शिक्षिका सुशीला विजय बनसोडे यांनी मेहनत घेतली.