साताऱ्यात उद्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:(सातारा,) :
पंचायत व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातारा जिल्ह्यात उद्या (दि.11 सप्टेंबर) सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत दिवसभराची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद सातारा येथे होणार असून ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

कार्यशाळेत अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे, अंमलबजावणीची रूपरेषा, ग्राम व पंचायत स्तरावरील उपक्रम, सहभागी घटकांच्या जबाबदाऱ्या, तसेच प्रभावी नियोजन व कार्यपद्धती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या उपक्रमात नेहरू युवा केंद्र, भजनी मंडळ, वारकरी संस्था, पाणी फाऊंडेशन तसेच विविध समाज प्रबोधन संस्था व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *