व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) श्री.सुनील (तात्या)काटकर
चाफळ :प्रतिनिधी श्रीकांत जाधव
माजगाव ता. पाटण मधील ग्रामपंचायत समोरील चौकामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून काँक्रीटकरण कामाचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मा.श्री. सुनील तात्या काटकर यांच्या हस्ते आज संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी सुनील काटकर म्हणाले की, माजगाव या गावाने नेहमीच छत्रपतींची पाठराखण केली आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत त्या छत्रपतींचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या अगोदर बरीच कामे केली आहेत.तसेच या पुढील काळात ही छत्रपतींची ताकद या गावाच्या पाठीशी राहील. मोहनराव पाटील यांनी छत्रपतींसाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे.त्यांचे हे योगदान छत्रपती कधीही विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा दादांनी महाराजांना शब्द टाकलाय तेव्हा तेव्हा महाराज त्यांच्यासाठी उभे राहिले आहेत. हा इतिहास आहे. परंतु या पुढील काळात जास्तीत जास्त ताकद दादांना देऊन या परिसराचा गावाचा आणि या भागाच्या सर्वांगीण विकासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. कामाच्या ठेकेदारांना कामाचा दर्जा सर्वोत्तम ठेवण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत,त्यातून जर निधी कमी पडल्यास,निधी मागण्याची सूचना केली तर तीही पूर्ण केली जाईल असे सांगितले. कामाच्या उद्घाटन प्रसंगी स्वतः छत्रपती येणार असून कामाचा दर्जा ठेवण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष देण्यास सांगितले. याप्रसंगी ॲड.विकास पवार, ग्रामपंचायत सदस्य सुनील शिवदास अशोक चव्हाण, दीपक गायकवाड,शुभांगी पाटील तसेच माजगाव विकास सोसायटीचे संचालक श्री.प्रकाश मोरे यांचेसह शंकर दादा मिरोखे-पाटील,सुदाम पाटील,जगन्नाथ जाधव, प्रकाश यशवंत शिखरे,संजयकुमार महिपाल अनिल भोसले, ॲड. चंद्रकांत कुलकर्णी, बजरंग कोळी,जितेंद्र कदम(फौजी)संपत आप्पा हिमणे, डी एम पाटील,बापू पवार, बापू अशोक गायकवाड, बाबू गायकवाड,तानाजी अवघडे उपस्थित होते.