व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) श्रीकांत जाधव चाफळ: प्रतिनिधी:
दिवसेंदिवस वाढत चाललेली वीजबिले लक्षात घेता तसेच काळानुसार रूपडं पालटण्याच्या दृष्टीने श्रीराम देवस्थान ट्रस्टने सोलर सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला आणि अभय गोडबोले यांनी राम मंदिरास सोलर सिस्टीम भेट दिल्याने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.
या सिस्टीमचे उद्घाटन नुकतेच विश्वस्त,सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले.या वेळी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी,उपाध्यक्ष दिलीप पाठक,सौ.मानसी माचवे,एल.एस.बाबर,अनिल साळुंखे ,व्यवस्थापक बा. मा.सुतार,सरपंच आशिष पवार,उपसरपंच सुरेश काटे,शशिकांत माने, मानसिंग साळुंखे,आकराम चव्हाण,संभाजी साळुंखे,विकास हिंदोळे,राजेंद्र पाटील, डी.एम.सुतार,पोलीस पाटील सागर चव्हाण,विनोद साळुंखे,मारुती साळुंखे उपस्थित होते.
अभय गोडबोले यांनी सुमारे ३० हजारांची सोलर सिस्टीम मंदिरासाठी भेट स्वरुपात दिली आहे.मंदिरामध्ये विजेचे एकूण ११ मीटर आहेत.दिवसेंदिवस वाढत चाललेली वीजबिले हे विश्वस्त मंडळांनी विचारात घेऊन या ठिकाणी सौर सिस्टीम उभारण्याचा निर्णय घेतला.या सौर सिस्टीममुळे मंदिरातील वीज अंखंडितपणे सुरू राहणार असल्याने भविष्यात विजेअभावी दैनंदिन पूजाअर्चा करताना कसलीही अडचण निर्माण होणार नाही एवढे मात्र निश्चित.