श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त म्हसवड शहरातील वाहतुकीत बदल : सपोनि सखाराम बिराजदार
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला
म्हसवड:प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाच्या निमित्ताने सोमवार, दिनांक २ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा होणार आहे. या रथोत्सवासाठी सातारा, पुणे, मुंबई, सांगली, सोलापूर यांसह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून लाखो भाविकांनी येण्याची अपेक्षा आहे. गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी म्हसवड पोलिसांनी १ ते ३ डिसेंबर या कालावधीत वाहतुकीत बदल केला आहे, अशी माहिती सपोनि सखाराम बिराजदार यांनी दिली.
वाहतूक मार्गामध्ये बदल:
सातारा-पंढरपूर व पंढरपूर-सातारा मार्ग
ही वाहतूक शिंगणापूर चौक, सूर्यवंशी बंगला, शिक्षक कॉलनी, भाटकी रोड व माळशिरस रोड मार्गे वळवण्यात येईल.
आटपाडी-मायणी व साताराकडे जाणारी वाहने
या वाहनांसाठी विरकरवाडी चौक, मसाईवाडी, मायणी चौक मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
वाहन पार्किंग व्यवस्था:
यात्रेच्या कालावधीत वाहतूक कोंडी व भाविकांना अडचण होऊ नये यासाठी पार्किंग व्यवस्थाही करण्यात आली आहे:
सातारा व फलटणहून येणाऱ्या वाहनांसाठी पोळ पंपाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था.
विटा, सांगली, कोल्हापूरहून येणाऱ्या वाहनांसाठी मायणी चौकात पार्किंग.
माळशिरस व पंढरपूरहून आलेल्या वाहनांसाठी माळशिरस चौकात पार्किंग.
आटपाडी व सांगलीहून येणाऱ्या वाहनांसाठी विरकरवाडी चौकात पार्किंग.
भाविकांना केलेले आवाहन:
म्हसवड शहरात गर्दी टाळण्यासाठी व रथोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी भाविकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळाव्यात, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या नियोजनामुळे भाविकांना तसेच रहिवाशांना कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी व्यक्त केला आहे.