ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाने वादात रखडलेल्या म्हसवड मधील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्त्याचे काम मार्गी
व्हिजन२४तास न्युज (संपादक ;अहमद मुल्ला )
म्हसवड :(प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभाग व म्हसवड नगरपालिका यांच्या वादात गेली अनेक वर्षे म्हसवड नगरपालिका हद्दीतील चांदणी चौक ते शिक्षक कॉलनीचा अत्यन्त खराब झालेल्या रस्त्याचे काम ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या आदेशाने मार्गी लागले
चांदणी चौक ते शिक्षक कॉलनीचा रस्ता गेली अनेक वर्षे खराब स्थितीत असून स्थानिक नागरिकांना या रस्त्यावरून जाता येताना खूप कसरत करावी लागत होती.हा रस्ता म्हसवड शहरांमध्ये वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून शाळा कॉलेजमधील हजारो विद्यार्थी तसेच पर्यंती, भाटकी, शिक्षक कॉलनी येथील हजारो प्रवासी, वाहनधारक या रस्त्यावरून दिवसभरात ये जा करतात, तसेच म्हसवड पोलीस स्टाफ, तसेच पोलीस स्टेशनमध्ये कार्यालयीन कामासाठी जाणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणच्या चिखल व पाणथळ रस्त्याचा फटका बसत होता . खड्डे व वर आलेले दगड चुकवून चालताना अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत या बाबत अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत
मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व म्हसवड नगरपालिका यांच्या वादात हा रस्ता तसाच पडून होता या बाबत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांच्या मागणीची त्वरित दाखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला चार दिवसात रस्त्याचे काम सुरु करण्याचे आदेश दिले असून अनेक वर्षे राखडलेले या रस्त्याचे काम मार्गी लागले त्यामुळे म्हसवड कर नागरिकांनी जयाभाऊंचे आभार मानले