लोकराजा शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया- मंत्री चंद्रकांत पाटील

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कोल्हापूर  :

लोकराजा राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे ते 14 मे दरम्यान त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कृतज्ञता पर्व आयोजित करत आहोत. 6 मे रोजी सकाळी 10 वाजता आपण जिथे कुठे असू तिथे 100 सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया. या उपक्रमात लोकप्रतिनिधी, संस्था, शासकीय कार्यालये, सर्व नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

शाहू महाराजांनी राज्य उत्तम चालवण्याबरोबरच सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळावं, दलितांना सवर्णांच्या बरोबरीने सर्वाधिकार मिळावेत, मान सन्मान मिळावा, मुलींचे शिक्षण व्हावं, गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं, शिक्षण सक्तीचं व्हावं, विधवा व्यवस्था सह अनेक सामाजिक सुधारणांसाठी प्रयत्न केले. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शाहू महाराजांचे वेगळे आणि आदराचे स्थान आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करुया, असेही आवाहन त्यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!