मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने 43B(H) हा व्यापारो वर्गासाठी नवीन कायदा लागू केला आहे. व्यापाऱ्याने खरेदी केलेल्या मालाचे बिल हे 45 दिवसांत अदा करण्याची सक्ती या कायद्यात घातली आहे,सदर कायदा आयकर विभागाशी जोडण्यात आला आहे,जर बिल 45 दिवसांपेक्षा पुढं गेलं तर ते थेट उत्पन्नात गृहीत धरून त्यावर 30%दंड आकारण्यात येणार आहे,आणि सदर कायद्यात अनेक गुंतागुंत आहे,जी व्यापारी वर्गास समजणे कठीण होऊन बसले आहे,त्यामुळे तमाम व्यापारी वर्गाची कुचंबणा झाली आहे,असे प्रतिपादन,इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष संजयकुमार कोटेचा यांनी केले.
नवीन कायद्याची सविस्तर माहिती देताना ते म्हणाले,सदर कायद्यामुळे व्यापारी वर्गात कमालीची भीती निर्माण झाली आहे,व्यापारामध्ये मोठी मंदी सुरू आहे,त्यात हे पैसे कसे भागवायचे?या विवंचनेत सर्व व्यापारी समाज आहे, हा कायदा पूर्वीच बनवून ठेवला आहे,फक्त विद्यमान वित्तमंत्र्यांनी सदर कायदा आयकर विभागाशी जोडून मोठा पराक्रम करून ठेवला आहे, दोन व्यापाऱ्यांच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारात आता केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे हे अनपेक्षित आहे, याचा कोणताही फायदा सरकारला नाही,ठराविक लोकांच्या फायद्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे,पूर्ण देशातील बाजारपेठ उध्वस्त व्हायच्या मार्गावर यामुळे आहे, जगातील सर्वात मोठी रिटेल बाजारपेठ म्हणून भारताचा लौकिक आहे,पण आपलंच सरकार ही बाजारपेठ आणि सामान्य व्यापार-व्यापारी संपवायच्या तयारीत आहे, “जर औकात असेल तर धंदा करा नाहीतर भीक मागा,”असे केंद्र सरकार म्हणत आहे, आधीच जी एस टी कायदा त्यात सगळं खेळतं भांडवल या जी एस टी च्या माध्यमातून सरकार काढून घेतंय, म्हणून विक्रमी वसुली दिसत आहे,आणि इतकं उत्पन्न मिळून देखील सरकारची भूक भागत नाही, सध्या या कायद्यामुळे लोक आपला माल पुरवठादार व्यापाऱ्यास परत पाठवत आहेत,कारण पैसे नाहीत,अशी दुर्दशा सुरू आहे,पण सरकार कोणतंही नमतं धोरण घेण्यास किंवा ऐकून घेण्यास सुद्धा तयार नाही, हे सगळं करून सरकारने काय मिळवलं?निश्चितपणे राज्यातील व्यापारी सरकारच्या या अडमुठेपणामुळे संतप्त आहेत,आणि नक्की या निवडणुकीत आपला राग व्यापारी समाज व्यक्त करण्याचा हे स्पष्ट इशाराही राज्याध्यक्ष कोटेचा यांनी शेवटी दिला. दरम्यान,इंडियन रिपोर्ट्स असोसिएशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,युक्रांद संघटनेचे राज्य कार्यवाह राजकुमार डोंबे यांनी व्यापाऱ्यांच्या बाजुने आंदोलन करण्याचाही इशारा दिलेला आहे.
===============]