व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर म्हसवड येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यांच्या विजयामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
म्हसवड येथील कार्यक्रमात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. महाविकास आघाडीच्या विलासराव माने, प्रा.विश्वंभर बाबर, जयसिहं राजेमाने,तेजसिह राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने,आकाश राजेमाने, विकास गोंजारी,बाबासाहेब माने, राहुल मंगरुळे, अनिल कांबळे, शिवाजी केवटे,आदी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय मतदारांना दिले असून, त्यांनी जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे वचन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली माढा मतदारसंघाच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या विजयाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आघाडीचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने धैर्यशील मोहिते पाटील यांचे अभिनंदन केले