व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड कायद्याचे काटेकोरपणे पालन करूनच मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करा, असे आवाहन म्हसवडचे सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी केले.
देशभरात येत्या सोमवारी (ता. १७) बकरी ईद साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, म्हसवड पोलिस ठाण्याने मुस्लिम समाजातील प्रमुखांना निमंत्रित करून सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सपोनि बिराजदार यांनी समाज बांधवांना कायद्याचे पालन करण्याचे आणि शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन केले.
सपोनि बिराजदार म्हणाले, देशभरात येत्या सोमवारी (ता. १७) बकरी ईद साजरी होणार आहे या अनुषंगाने सातारा पोलीस प्रशासनातर्फे काही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत त्यानुसार कायद्याने गोहत्या बंदी असून, याचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, या दिवशी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यात यावी तसेच जातीय सलोखा अबाधित राखावा या अनुषंगाने नागरिकांनी आपली वर्तणूक ठेवावी यावेळी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जी कोणी व्यक्ती त्यास जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,
सर्व मुस्लिम बांधवाना सातारा पोलीस प्रशासनातर्फे शुभेच्छा देत आहे “बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करावा,सर्व हिंदू बांधवानी देखील या मुस्लिम बांधवाच्या सणात उत्साहाने सहभागी व्हावे पण त्याचबरोबर कायद्याचे पालन करणेही आवश्यक आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन विभाग सतर्क आहे आणि समाज बांधवांनीही आपला जो जातीय सलोखा आहे तो अबाधित ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.”असे आवाहन शेवटी सपोनि बिराजदार यांनी केले
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे गोपनीयचे अभिजित भादुले म्हसवड मधील सर्व मुस्लिम बांधव अनेक प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन सण शांततेत आणि सलोख्याने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.