राष्ट्रीय शैक्षणिक स्पर्धेसाठी सीबीएसई अभ्यासक्रम महत्वपूर्ण. …. संभाजी सावंत
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
म्हसवड ..प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक स्पर्धा परीक्षेसाठी सीबीएसई अभ्यासक्रम महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन माजी पोलीस उपाधीक्षक संभाजी सावंत यांनी म्हसवड येथे केले.
कृषी विकास प्रतिष्ठान संचलित क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेला सीबीएसई मान्यता मिळाल्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर होते.तर प्रमुख मान्यवर म्हणून पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत,त्यांच्या पत्नी सौ. वर्षा सावंत, संस्था सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संभाजी सावंत म्हणाले विद्यार्थी मित्रहो तुम्ही खूप नशीबवान आहात .संस्थाध्यक्ष विश्वंभर बाबर व सुलोचना बाबर यांच्या अपार परिश्रमातून तुमचं भविष्य उज्वल घडवणारी सीबीएसई
ही राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण प्रणाली या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे.राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवण्यासाठी ही शिक्षण पद्धती पायाभूतपणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग ते सीईटी परीक्षेचा पाया या वैशिष्टपूर्ण शिक्षण प्रणालीमुळे मजबूत होत असतो.संस्थेने तुम्हाला या निमित्ताने एक संधी उपलब्ध करून दिलेले आहे.या संधीच सोनं करा असे आवाहन सावंत यांनी केले.आई वडील व गुरुजनाचा आदर ठेवा,जीवनात उद्दिष्ट निश्चित करा, जिद्द चिकाटी ठेवा.यशस्वी जीवनासाठी परिश्रमाला पर्याय नसल्याचे सांगून या निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाच्या यशामध्ये सीबीएसई प्रणालीच्या निमित्ताने अजून एक सन्मानाचा शिरपेच समावेश झाल्याबद्दल सावंत यांनी आनंद व्यक्त केला.श्री व सौ बाबर दांपत्याच्या आज वरच्या संघर्षाबद्दल आदर व्यक्त करून या संकुलाला उज्वल भविष्य असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

यानिमित्ताने संस्था सचिव सुलोचना बाबर यांनी संस्थेच्या कार्याचा व उपक्रमशीलतेचा आलेख तपसीलनुसार सांगितला.प्रचंड अडचणीच्या कालावधीत संस्था कशी उभी केली हे सांगताना सुलोचना बाबर भावना विवश झाल्या व त्यांना आनंदाश्रुनीची वाट मोकळी करून द्यावी लागली.यावेळी संपूर्ण सभागृह सदगधित झाल्याने अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.संस्थेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना एक नवीन शिक्षण प्रणाली उपलब्ध करून दिली आहे त्याचा लाभ पालक व विद्यार्थी घेण्याचे आवाहन सुलोचना बाबऱ यांनी केले.
या निमित्ताने पोलीस उपाधीक्षक संभाजी सावंत यांचा सपत्नीक तसेच
प्राचार्य राहुल फुटाणे व अभिजीत सावंत यांचा सन्मान प्रतिनिधिक स्वरूपात संस्थेतर्फे करण्यात आला. संस्थेला सीबीएसई शाळा मान्यता मिळाल्या निमित्त पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छंदीपणे आनंद साजरा केला .सूत्रसंचालन उपशिक्षक
सुवर्णा टाकणे यांनी केले तर उपस्थितांचे उपस्थितांचे आभार चंद्रकांत तोरणे यांनी व्यक्त केले.