दहिवडी येथे डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी दोघावर गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी)

                सोनोग्राफी सेंटर पेटवून देण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन साडेपाच हजार रुपये घेऊन कानाखाली मारली अशी फिर्याद मयूर शिवाजी धायगुडे रा.कोरेगाव यांनी दहिवडी पोलिसात दिली आहे. डॉक्टर मयूर शिवाजी धायगुडे वय 37 वर्ष धंदा वैद्यकीय  तज्ञ यांचे दहिवडी तालुका माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत मायणी रोड तलाठी कार्यालय शेजारी येथे सोनोग्राफी सेंटर आहे.धायगुडे यांचे मुळगाव पारगाव खंडाळा तालुका खंडाळा जिल्हा सातारा हल्ली राहणार आझाद चौक कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आहे.

             प्रवीण सूर्यवंशी राहणार भांडवली तालुका याने आपली पत्नी सौ प्रियंका प्रवीण सूर्यवंशी हिला सोनोग्राफी सेंटर वर तपासणी करण्यासाठी दाखल केले होते.. सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये तफावत आढळून आली होती. सोनोग्राफी रिपोर्ट बदलून देण्याची मागणी केली, रिपोर्ट बदलून देत असताना प्रवीण सुर्यवंशी यांनी डॉक्टर मयुर धायगुडे यांना दमदाटी करून साडेपाच हजार रुपये देण्याची मागणी केली, व न दिल्यास सोनोग्राफी सेंटर पेटवून देण्याची व जीवे मारण्याची  धमकी दिली.. डॉक्टर मयूर धायगुडे यांनी भिंती पोटी आँनलाईन वरुन साडेपाच हजार रुपये दिले. त्यानंतरही एक अनोळखी तरुण व प्रविण सुर्यवंशी यांनी तूमची बदनामी करतो तूमच्याकडे पेशंटच येऊ देत नाही असे म्हणत शिवीगाळ करत निघून गेले 

या नंतर डॉक्टर मयुर धायगुडे यांनी दहिवडी पोलिसात तक्रार दाखल केली असून एपीआय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खाडे हे अधिक तपास करीत आहेत


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!