चिमुकलीच्या न्यायासाठी शिवडे येथे कॅन्डल मोर्चा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते उंब्रज कराड

सासपडे येथे अल्पवयीन मुलगी कु. आर्या चव्हाण हिच्यावर नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न करून तिचा अमानुष रित्या खून केल्याबद्दल त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी व कु. आर्या चव्हाण हिला श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी शिवडे येथे कॅन्डल मोर्चा काढण्यात आला होता

शिवडे गावातील सर्व माता, भगिनी, मुली तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग व सर्व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे या कॅन्डल मोर्चात सहभागी झाले होते.हा मोर्चा शिवडे ग्रामपंचायत येथून भैरोबा मंदिर,हनुमान वाडी फाटा,ते प्राथमिक शाळेच्या पाठीमागून पुन्हा ग्रामपंचायत असा काढण्यात आला होता.

नराधमाला फाशी द्या बेटीच्या न्यायासाठी लढू या या अशा घोषणा शिवडे ग्रामस्थ करीत होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संताप डोळ्यात अश्रू आणि हातात न्यायाची मागणी घेऊन नागरिक प्रशासनाला जागा करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या मोर्चात महिलांचा मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता हातात मुलीचे फोटो,कॅण्डल, काळ्या फिती आर्याला न्याय द्या अशा घोषणांनी परिसर अक्षरशा दणाणून गेला होता तरी आरोपीला लेकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी शिवडे ग्रामस्थांकडून यावेळी शासनाकडे मागणी करण्यात आली व जोडे मारून आरोपीच्या फोटोस दहन करण्यात आले ..


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *