म्हसवड मध्ये रविवार दिनांक २७ ऑगस्ट  रोजी कर्करोग बाबत जागरुकता, मार्गदर्शन आणि तपासणी शिबीर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड दि (प्रतिनिधी)
कर्करोग बाबत जागरुकता, मार्गदर्शन आणि तपासणी शिबीर म्हसवड येथे रविवार दिनांक २७ ऑगस्ट  रोजी आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबीराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन सर्वज्ञ सेवा संस्था, म्हसवडचे संस्थापक अध्यक्ष इंजि नितीन तिवाटणे यांनी केले आहे.
     सध्याची बदललेली जीवनशैली तसेच इतर अनेक कारणांमुळे कर्करोग्याचे प्रमाण वाढले आहे.कर्करोग झाला आहे हे समजताच रोगी घाबरतो,त्याला कोणत्या तापसण्या कराव्यात ,कोठे औषधोपचार करावेत असे अनेक प्रश्न पडतात.अशा लोकांना सर्वतोपरी मदत करता यावी यासाठी इंजि नितीन तिवाटणे यांनी सर्वज्ञ सेवा संस्थेची स्थापना केली.व यासंस्थेच्या इमारत बांधकामाचा त्यांनी शुभारंभ केला आहे.
      या संस्थेमार्फत रविवार दिनांक २७ ऑगस्ट  रोजी दुपारी 2 वाजता म्हसवड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे कर्करोग बाबत जागरुकता, मार्गदर्शन आणि तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
      या शिबिरात   डॉ. मुकुल अरविंद घरोटे (कर्करोग तज्ञ, मुक्ता कॅन्सर क्लिनिक – नाशिक) हे कर्करोगची लक्षणे, कर्करोग झाल्याचे कसे ओळखावे,कर्करोगावर उपाय,कर्करोगवर नवीन शोध,कर्करोगावरील उपचारासाठी शासकीय योजना   या विषयावर  मार्गदर्शन करणार आहेत.
   या शिबिराचा लाभ घेण्याचे तसेच सर्वज्ञ सेवा संस्थेच्या इमारत बांधकामास मदत करण्याचे आवाहन इंजि नितीन तिवाटणे यांनी केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!